दिनेश आदलिंग
'स्वयंप्रेरणा' या संस्थेचे प्रणेते व संस्थापक-संचालक

दिनेश आदलिंग बद्दल
दिनेश आदलिंग हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व असून महाराष्ट्रातील अग्रणी युवा व्याख्याते म्हणून सुपरिचित आहेत. एक संवेदनशील कवी, विद्रोही प्रवचनकार, प्रेरणादायी वक्ता, युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेली पंधरा वर्षे ते विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. याचबरोबर ते 'स्वयंप्रेरणा' या संस्थेचे प्रणेते व संस्थापक-संचालक आहेत.
अध्यात्म, तत्वज्ञान, व मानसशास्त्र हे त्यांचे अभ्यासविषय असून संतसाहित्यात त्यांना विशेष रुची आहे. आजतागायत तीन हजारांहून अधिक पुस्तकांचे वाचन केले असून वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांनी ज्ञानेश्वरी व तुकोबांच्या अभंगांवर गावोगावी विद्रोही प्रवचने करायला सुरुवात केली. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी 'सुगंध' हा पहिला सामाजिक आशय असलेला काव्यसंग्रह लिहून पुढे प्रकाशित केला.
त्यांचे 'स्व'चे आत्मभान देणारे 'मी' हे दीर्घकाव्य २०११ मध्ये कविवर्य ग्रेस यांच्या हस्ते प्रकाशित झाले असून ते आजही कायम चर्चेत आहे.
'यशाचा कणा-स्वयंप्रेरणा' हे त्यांचे गाजलेले पुस्तक असून अनेकांच्या आयुष्यात या पुस्तकाने सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.
'स्वयंप्रेरीत युवा राष्ट्राची गरज' या विषयावर महाराष्ट्रभर विविध महाविद्यालयातील लाखो विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला आहे.
महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यात आणि भारताबाहेर सिंगापूर, इंडोनेशिया या देशांमध्येही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेरणादायी विचारांचा जागर सरांनी केलेला आहे.
अलीकडे त्यांनी 'स्वयंप्रेरीत उद्योजक व्हा' आणि 'हॅप्पी लाईफ हॅप्पी बिजनेस' हे उपक्रम खास मराठी नवउद्योजकांसाठी हाती घेतले असून त्यांच्या व्यावसायिक सेमीनार्स व कार्यशाळांना तरुणांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
स्वाभिमानी, आत्मविश्वासूआणि स्वयंप्रेरीत युवकांची फळी उभी करण्याच्या ध्येय्याने झपाटलेला तरुण हेच दिनेश आदलिंग यांची ओळख आहे.
अनेक नामवंत संस्थांनी विविध पुरस्कार देऊन दिनेश आदलिंग यांचा सन्मान केला आहे.
त्यातील काही मोजके पुरस्कार :-
२००३
२००७
२००९
२००९
२०११, औरंगाबाद
२०१३
फुले एज्युकेशन सोसायटीचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार
केशवसुत स्मृती पुरस्कार
काव्यभूषण पुरस्कार
(कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते)
निळू फुले यांच्या हस्ते गुणवंत कार्यकर्ता सन्मान
छत्रपती शंभूराजे युवारन पुरस्कार
शाहीर अमरशेख सन्मान